काळूबाई मंदिराच्या नवव्या वर्धापन सोहळ्यानिमित्त देवीला लोकसहभागातून चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्ण मुखवटा अर्पण

पुणे : पुण्यातील उत्तमनगर येथील काळूबाई मंदिर म्हणजे पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचे श्रद्धास्थान! आज मंदिराच्या नवव्या वर्धापन सोहळ्यानिमित्त देवीला लोकसहभागातून सुवर्ण मुखवटा अर्पण केला जात आहे. या मंगल समयी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आपल्या सर्वांवर कळत नकळतपणे आईची कृपादृष्टी असते. देवीला आपण श्रध्देने जे देतो त्याच्या दुप्पट ती आपल्यावर सुखाचा वर्षाव करत असते. त्यामुळे आज उत्तमनगर येथील सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने आई काळूबाईच्या चरणी मनोभावे मुखवटा अर्पण केला. आईची कृपादृष्टी आणि आशीर्वाद असाच सर्वांवर कायम रहावा, अशी प्रार्थना यावेळी पाटील यांनी आईच्या चरणी केली. पाटील यांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!