कोथरुड मतदारसंघात टर्फ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन, चंद्रकांत पाटील यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडुंना दिले प्रोत्साहन

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘नमो चषक २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघात टर्फ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, कोणत्याही खेळामध्ये गुणवत्ता, क्षमता, परिश्रम आणि धैर्याची कसोटी लागते. प्रत्येक जण आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा हिरिरीने प्रयत्न करत असतो. यातून स्पर्धात्मक क्षमतेचा इतिहास लिहिला जात असला तरी, मित्रत्वाचे धागेही गुंफले जात असतात. मैत्रीचा हाच धागा वृद्धिंगत होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘नमो चषक २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत कोथरुड मतदारसंघात टर्फ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज या स्पर्धेला भेट देऊन खेळाडुंना प्रोत्साहन देऊन स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी फुटबॉल खेळाचा मनमुराद आनंदही लुटला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!