राज्याच्या विकासला चालना देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

9
मुंबई : तीन पक्षांच्या महायुती सरकारने ऐकू खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटींचा अंतरिम अर्थसंकल्प काल सादर केला. महायुती सरकारने आज सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला चालना देणारा तसेच सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, महाराष्ट्र सरकार हे बळीराजाचे हित साधणारे सरकार आहे. म्हणूनच, मायबाप शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष प्राधान्य देण्यात आले असल्याची बाब अत्यंत आनंदादायी आहे. तसेच, अर्थसंकल्पात गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला असल्याची बाब राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय आश्वासक आहे.
पाटील पुढे म्हणाले कि, अर्थसंकल्पात शिक्षण, संशोधन, आरोग्य, कृषी, पर्यावरण, महीला सक्षमीकरण, आदिवासी विकास या घटकांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. यामुळे, आजचा अर्थसंकल्प कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल असा ठाम विश्वास वाटत असल्याचे पाटील हाल. या अर्थसंकल्पासाठी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.