आर्टिकल 370″ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला कोथरुडकरांचा उदंड प्रतिसाद

23

पुणे : कलम 370 रद्द करताना अनेक संघर्ष, कायदेशीर प्रक्रियांना सामोरे जावे लागले. या सर्व बाबी”आर्टिकल 370″ या चित्रपटाच्या माध्यमातून एका रोमांचक पद्धतीने पडद्यावर मांडल्या आहेत.  हे सर्व कोथरूडकारांन अनुभवता यावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात “आर्टिकल 370” या चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित केले होते.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने भारतीय संसदेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू कश्मीर संबंधित ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हे कलम रद्द होणे काश्मीरसह देशवासियांसाठी आशेचा, प्रगतीचा एक नवा अध्याय रचणारी घटना होती. या निर्णयाने जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांना आणि त्यांच्या भावी पिढयांना एक सुरक्षित वातावरण लाभले असुन त्यांना प्रगतीच्या वाटेवर नेले असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
शनिवारी २ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता तसेच रविवारी दुपारी १२ व ३ वाजता सिटीप्राईड कोथरूड येथे “आर्टिकल 370” या चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित केले होते. पाटील यांच्या कोथरूड कार्यालयात तिकिटासाठी लोकांनी चांगलीच गर्दी केली होती. चित्रपट पाहिल्यावर नागरिकांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक तर केलेच यासोबतच हा कलम हटवण्यामागे ज्या लोकांनी कष्ट केले त्यांचे देखील आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.