चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

13

पुणे : महाशिवरात्रि निमित्त कसबा पेठेतील भरत मित्र मंडळ महाशिवरात्री उत्सव समितीच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती. या पावन पर्वाचे औचित्य साधुन पाटील यांनी महादेव यांची मनोभावे पूजा करुन भाविकांना प्रसाद वाटप केला. दरम्यान, सर्व भाविकांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छाही दिल्या.

महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा संजय चोरडिया, शाहीर नंदेश यांना चंद्रकांत पाटील यांनी शिवशक्ती पुरस्काराने सन्मानित केले. दरम्यान, जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानही केला. महाराष्ट्राला समृध्द बनविण्यात या साऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे गौरव उद्गार काढून त्यांच्या भविष्यातील कार्यकर्तुत्वसाठी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.