राज्याच्या नवीन महिला धोरणाच्या अंमलबजावणीमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल, असा दृढ विश्वास वाटतो – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

27
मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर झाले आहे. या धोरणाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनापासून स्वागत केले. यासाठी राज्यातील माता भगिनींना मन:पूर्वक शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, महिलांना समान संधी, रोजगारात प्राधान्य, कामकाजी महिलांना गर्भवती असतानाच्या काळात विविध सुविधा यांसारख्या अनेक उपाययोजना या धोरणात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल, असा दृढ विश्वास वाटत असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
राज्याचे नवीन महिला धोरण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल जाहीर केले.  राज्याच्या चौथ्या महिला धोरणामुळे महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी, शासन-प्रशासनात योग्य स्थान, अर्थसंकल्पात योग्य तरतूद, रोजगार-स्वयंरोजगारात समान संधी, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, संपत्तीत समान वाटा, उद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन व बाजारपेठ, आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे.  निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांनीही मातृत्व आणि पितृत्व रजा द्यावी, असा प्रस्ताव आहे. सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस धोरणात करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.