“DIPEX 2024” या उपक्रमाच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावेल, अवघ्या विश्वाला भारताचा हेवा वाटेल अशा संशोधनांना प्रोत्साहन मिळो – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
नवी मुंबई : नवी मुंबई नेरूळ येथील तेरणा इंजिनियरींग कॉलेज येथे “अभियांत्रिकी क्षेत्र आणि शाश्वत भविष्य” या विषयावर आयोजित 33 व्या “DIPEX 2024” या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.
सृजन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले “DIPEX” हे महाराष्ट्र आणि गोव्यातील अभियांत्रिकी/तंत्रज्ञान आणि कृषी अभ्यासक्रमातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सचे भारतातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित राज्यस्तरीय प्रदर्शन आणि स्पर्धा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावेल, अवघ्या विश्वाला भारताचा हेवा वाटेल अशा संशोधनांना प्रोत्साहन मिळो अशी भावना पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.