मुंबई विद्यापीठाच्या जलतरण तलावाची तातडीने दुरुस्ती करावी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात मंगळवारी सायंकाळी मुंबई विद्यापीठातील जलतरण तलावाच्या कामाचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील जलतरण तलाव आवश्यक त्या दुरुस्ती करून घेत तातडीने खुला करावा, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.
पाटील यांनी सांगितले की, जलतरण तलावाच्या पूर्णत्वासाठी तांत्रिक आणि जलतरण क्षेत्रातील तज्ज्ञाची मदत घ्यावी. तेथे आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता करून द्यावी. जेणेकरून जलतरण तलावाचा वापर होऊ शकेल. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव रस्तोगी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अभियंता श्रीमती नलावडे यांनी जलतरण कामाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, विद्यापीठाच्या अभियंता छाया नलावडे आदी उपस्थित होते.