पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील तीन सेमी कंडक्टरच्या सुविधांचा पायाभरणी समारंभ संपन्न… मुंबईतून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित

23
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे गुजरातमधील दोन आणि आसाममधील एका सेमी कंडक्टर सुविधेचा रिमोटद्वारे शुभारंभ करण्यात आला. मुंबईतील मंत्रालयातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले.
मोदीजींनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक चिपचे महत्त्व अधोरेखित केले. १९६० पासूनचे स्वप्न आता पूर्ण होत असून भारताला सेमी कंडक्टरच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून ग्लोबल हब बनवण्याचा विश्वासही मोदीजींनी यावेळी व्यक्त केला. मोदीजींचे हे व्हिजनच भारताला प्रगतीपथावर अग्रेसर ठेवते आहे.
यावेळी गुजरातमधून केंद्रीय रेल्वे तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्वनी वैष्णव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा, टाटा ग्रुपचे नटराजन चंद्रशेखरन, सीजी पॉवरचे वेलायन सुबिह उपस्थित होते.
गुजरामध्ये ढोलेरिया, सानंद तर आसाममध्ये मोरीगाव येथे सेमी कंडक्टर उत्पादन होणार आहे. भारतातून ६० हजार महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी सामील झाले होते तर महाराष्ट्रातून ४८९२ महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे ६ लाख ८६ हजार ९७२ विद्यार्थी सामील झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.