आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीत चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या कार्यकर्त्यांची समन्वय बैठक संपन्न

20
बारामती : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपकडून आता जोरदार प्रचाराला सुरवात झाली आहे. अकोला दौऱ्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजपच्या विविध कार्यालयांना भेटी दिल्या. तसेच तेथील कार्यकर्त्यांची देखील भेट घेत अनौपचारिक संवाद देखील साधला. यासोबतच बारामती मतदारसंघ येथे महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयास चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच बारामती शहरातील मोरोपंत सभागृह येथे महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक यादरम्यान संपन्न झाली. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीसाठी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार राहुल कुल, प्रदीप गारटकर, संजय माशिलकर, रमेश आप्पा थोरात, सुरेश आण्णा घुले, राजेश पांडे, वासुदेव काळे, अशोक टेकावडे, विश्वास नाना देवकाते, जालिंदर कामठे, सुनील चांदेरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.