या भेटीमुळे मिळालेला आनंद अतिशय सुखद आणि समाधानकारक … बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रंजनकाका तावरे यांच्या घरी चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट

20

बारामती : बदलती जीवनशैली, नवसंकल्पनांचा स्वीकार तसेच आर्थिक स्तर उंचावल्याने वाडा संस्कृती आता इतिहासजमा होत आहे, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे वाड्याच्या वातावरणातून आधुनिक, स्वयंपूर्ण निवासात गेलेले रहिवासी ‘गुजरा हुआ जमाना’ म्हणत त्या वाड्यांचे जुने दिवस आठवून हळवे होतात. मात्र, अशीही काही ठिकाणे आहेत , जी आपली ही वाड्यांची संस्कृती जपून आहेत. असंच एक घर म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रंजनकाका तावरे यांचं! बारामती दौऱ्यादरम्यान याठिकाणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासादरम्यान रंजनकाकांच्या घरी जाण्याचा योग आला. आजही त्यांनी आपलं घर; नव्हे वाडा जोपासला आहे हे पाहून अतिशय आनंद झाला. रंजनकाकांमुळे गावच्या संस्कृतीचा सुगंध नव्या पिढीसमोरही दरवळत आहे. या भेटीमुळे मिळालेला आनंद अतिशय सुखद आणि समाधानकारक असल्याचे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.