महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून महायुतीचेच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

16
पुणे : आगामी लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सोमवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विविध मतदरदारसंघात भेटी देऊन तेथील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत आहेत. दरम्यान आज पाटील यांनी वडगाव शेरी तसेच कसबा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची समन्वय बैठक घेतली. यावेळी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज विधानसभेच्या वडागाव शेरी मतदारसंघातील महायुती कार्यकर्त्यांच्या समन्वय बैठकीस उपस्थित राहिलो. लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिशय आनंद वाटत असल्याचे पाटील म्हणाले. या बैठकीत वडगाव शेरी मतदारसंघातील महायुतीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड विजयाचा संकल्प केला. या बैठकीस महायुतीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील यांनी पुढे कसबा मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीस हजेरी लावली . या बैठकीला मंत्री उदयजी सामंत यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी, महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून महायुतीचेच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.