पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे दौऱ्या दरम्यान श्रीक्षेत्र देहू येथे जाऊन तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. पाटील यांनी यावेळी टाळ वाजवत भजनाचा आनंद देखील लुटला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त इस्कॉनच्या माध्यमातून श्रीक्षेत्र देहू येथे तीन दिवस या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक हे महानाट्य पाहून आनंद घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आपला महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची महान परंपरा महाराष्ट्रच्या या पुण्यभूमीला लाभली आहे. या सर्व संतांनी मनुष्याने आपल्या जीवनात काय करावे, काय करु नये, सदाचारी जीवन कसे जगावे हे अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितले. संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेतील अजरामर अशा संत साहित्यात मोलाची भर घातली. कधीही भंग न पावणाऱ्या हजारो अभंगांची रचना करून भाविकांना आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती कशी करावी याची सोप्या पद्धतीने शिकवण दिली आहे. त्यांच्या याच जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे महानाट्य म्हणजे ” जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त इस्कॉनच्या माध्यमातून श्रीक्षेत्र देहू येथे तीन दिवस या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाटील यांना हे महानाट्य पाहण्याची संधी लाभली. हे महानाट्य पाहून अतिशय आनंद झाला असल्याचे पाटील यांनी म्हटले.
Get real time updates directly on you device, subscribe now.