महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करावे – चंद्रकांत पाटील
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पुणे शहर महिला मोर्चाची बैठक संपन्न झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून द्यावे. त्यासाठी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले.
या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्यासह भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र बापू मानकर पदाधिकारी उज्ज्वला गौड, आरती कोंढरे, स्वाती मोहोळ, गायत्री खडके, प्रियांका शेंडगे यांच्यासह शहराच्या महिला मोर्चाच्या इतर पदाधिकारी उपस्थित होते.