पुणे : भारतीय जनता पार्टीचे नेते, मार्गदर्शक खासदार गिरीशभाऊ बापट यांचा आज प्रथम स्मृतिदिन! यानिमिताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवासस्थानी तसेच बापट यांच्या निवासस्थांनी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत गिरीषभाऊ बापटजी यांच्या स्मृतिदिनी आज आपल्या कोथरुड मधील निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान त्यांनी बापट यांच्या निवासस्थानी देखील भेट दिली. भाऊंना जाऊन एक वर्षाचा काळ लोटला, यावर विश्वासही बसत नाही. कारण भाऊ स्मृतिरुपाने सदैव सोबत असल्याचे पाटील यांनी म्हटले. आज प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना पाटील यांनी अभिवादन केले. या वेळी वहिनी, गौरव आणि स्वरदा यांच्याशी बोलताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे पाटील म्हणाले.