कोल्हापुरमधून महायुतीचे संजय मंडलिक तसेच हातकणंगले मधून धैर्यशिल माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन – चंद्रकांत पाटील

6
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वत्र जोरदार तयारी सुरु झाली आहे. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी कोल्हापुरमधून महायुतीचे संजय मंडलिक तसेच हातकणंगले मधून धैर्यशिल माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी कोल्हापुरमधून संजय मंडलिक तसेच हातकणंगले मधून धैर्यशिल माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कोल्हापूरवासी आपणास मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा ठाम विश्वास वाटत असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले. तसेच त्यांनी देदीप्यमान विजयासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.