पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर सर यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे : पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानदंड. यंदा महोत्सवाचे 18 वे वर्ष असून; भाजपा नेते आणि महोत्सवाचे आयोजक उज्ज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या संगीतमय महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर सर यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.