पुणे : भाजपा पुणे शहर पर्यावरण आघाडी आणि वैद्यकीय आघाडीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी शहर कार्यालयात संपन्न झाली.
भाजपच्या विविध आघाड्या आणि मोर्चांचे पक्ष संघटनेतील योगदान अत्यंत मोलाचे आहे. या माध्यमातून पक्षाचे कार्य समाजापर्यंत पोहोचत असते. आज झालेल्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. त्यासाठी काय करता येईल, यावर सविस्तरपणे चर्चा झाली. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले.
या बैठकीस शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा पुणे शहर लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, रवी साळेगावकर, वैद्यकीय आघाडीचे डॉ. गणेश परदेशी यांच्यासह वैद्यकीय आणि पर्यावरण आघाडीचे संदीप काळे आणि अन्य प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.