कोथरुड मतदारसंघातील शिवप्रताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट
पुणे : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोथरुड मतदारसंघातील शिवप्रताप प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.