पुणे : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीचे ४००+ खासदार निवडून येतील, असा संकल्प केला आहे. नेत्याची आज्ञा हे कर्तव्य मानून माननीय मोदीजींचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी काम करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा प्रभाग निहाय बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्या सत्रात कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग १८ आणि १९ चा आढावा घेतला. माननीय मोदीजींचा संकल्प सिद्धीस आणण्यासाठी प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपा नेते हेमंत रासने, राजेश येनपुरे, राजेंद्र काकडे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.