मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी पुण्यातील स्थायिक उत्तर आणि दक्षिण भारतीय नागरिकांच्या आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी योगदान द्यावे – चंद्रकांत पाटील
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पुणे शहर कार्यालयात भाजपा उत्तर आणि दक्षिण भारतीय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. दरम्यान पुणे लोकसभेचे भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी पुण्यातील स्थायिक उत्तर आणि दक्षिण भारतीय नागरिकांच्या आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आगामी निवडणूक काळात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कशा पद्धतीने काम करावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सर्वांनी ताकदीने आणि मोठ्या मताधिक्याने भाजपा-महायुतीचाच उमेदवार निवडून आणण्याचा निश्चय केला.