पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र प्रचाराचे वातावरण आहे. या अनुषंगाने पुण्यातील शिवाजीनगर, उत्तरमधील प्रभाग क्रमांक ८ आणि खडकी कॅन्टोन्मेंटमधील पदाधिकाऱ्यांशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, १० वर्षांत मोदीजींनी सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. आता विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ४००+ चा संकल्प केला आहे. मोदीजींचा हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी संपर्क वाढवा, असे आवाहन या प्रसंगी पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
या वेळी राजेश पांडे, रवी साळेगावकर, दत्ताभाऊ खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, गणेश बगाडे, बंडू ढोरे, अर्चना मुसळे, आनंद छाजेड, दत्ता गायकवाड, अभय सावंत, भापकर, कुलदीप सावळेकर यांच्यासह अन्य मान्यवर आणि पदाधिकारीही उपस्थित होते.