मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करा – चंद्रकांत पाटील

67

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १६, १७, १९ ,२०, २५, २८ आणि ३१  मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, माननीय मोदीजींनी ४०० पार चा संकल्प केला आहे. विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. “अब की बार ४०० पार” चा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी, तसेच मुरलीधर मोहोळ यांना त्याच ४०० पैकी एक असण्याचा बहुमान मिळण्यासाठी प्रत्येकाने जिद्द आणि सचोटीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क वाढवावा, असे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आ.सुनील कांबळे, राजेश येनपुरे, दीपक पोटे,पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले, सुशांत निगडे, हरिश परदेशी, विशाल कोंडे, मनिषा लडकत, जयप्रकाश पुरोहित यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.