सेवा प्रकोष्टने समाजाची गरज ओळखून काम केले पाहिजे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

14
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. येथील विविध मतदारसंघांना भेटी देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान भाजपा सेवा प्रकोष्टच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, सेवा गरजेतून निर्माण होते, तेव्हा त्याचं समाजात कौतुक होतं. माझ्या गुरुंनी नेहमी मला शिकवलं आहे की, जे-जे तुला जीवनात आवश्यक आहे, ते-ते सर्व इतरांना ही मिळालं पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न करा . त्यातूनच कोथरुड मध्ये आमदार झाल्यापासून अनेक उपक्रम पाटील यांनी राबविले. विवीध उपक्रम राबवून कोथरुडकरांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला. सेवेचे हे व्रत आजही सुरू आहे. त्यामुळे सेवा प्रकोष्टनेही समाजाची गरज ओळखून काम केले पाहिजे, असे आवाहन यावेळी पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा, डॉ. पूनम राऊत, हर्षल मंत्री, अतुल लाहोटी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.