पुणे : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा पुणे शहराच्या माध्यमातून आज घर चलो अभियान राबवण्यात येत आहे. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील निवासस्थानी भाजपाचा ध्वज फडकावून स्थापना दिन साजरा केला. यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि,हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आहे. मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये कार्यरत आपल्या घरावरचा मागच्या वर्षीचा झेंडा बदलणं, आपल्या घरी लोकांना चहापानाला बोलावण, कार्यालयातीलझेंडा बदलणं, काही ना काही संकल्प करणं असं करत असतो. आज रविवार सोयीचा म्हणून शहरातल्या १० हजार कार्यकर्त्यांनी २५ घर केल्याशिवाय घरी जायचं नाही. अशी अडीच लाख घरं करायची. प्रत्येक घरामध्ये ४ मतदार असतील तर दहा लाख मतदारांना २१ लाखाच्या अगेन्स्ट १० लाख मतदाराना एका दिवशी संपर्क करायची खूप महत्वाकांक्षी योजना आखली. मी स्वतः २५ घरं करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Get real time updates directly on you device, subscribe now.