प्रवचनाच्या रूपाने दैवी प्रवास घडणारा अध्यात्मिक मार्ग म्हणजे कीर्तन – चंद्रकांत पाटील

19
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघातील अखिल पौडफाटा येथील अखंड हरिनाम किर्तन सोहळ्यास उपस्थित राहून हरिनामाचा जयघोष करुन कीर्तन महोत्सवास शुभेच्छा दिल्या.  प्रवचनाच्या रूपाने दैवी प्रवास घडणारा अध्यात्मिक मार्ग म्हणजे कीर्तन ! असे पाटील यांनी म्हटले.
रविवारी भाजपच्या घर चलो अभियानादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी अखंड हरिनाम किर्तन सोहळ्यास हजेरी लावली. यावेळी युवा किर्तनकार जयश्रीताई येवले यांच्या सुश्राव्य किर्तनाने मंत्रमुग्ध होऊन हरिनामाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात पाटील तल्लीन झाले.
यावेळी भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, प्रशांत हरसुले, मंजुश्री खर्डेकर, कुलदीप सावळेकर, हर्षवर्धन मानकर, शुभम माताळे, विजय पारगे, आकाश मोकर यांच्या सह इतर मान्यवर आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.