पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आगमी लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी भाजपचे घर चलो अभियान सुरु करण्यात आले. यावेळी पाटील यांनी घरो घरी जाऊन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्याचे आव्हान केले. दरम्यान पाटील यांनी यावेळी कोथरूड मतदारसंघातील श्री दत्त हॉटेलचे मालक राकेश शिंदे आणि कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीत चहाचा आस्वादही घेतला.
पुणे शहर भाजपाच्या घर चलो अभियानाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघातील श्री दत्त हॉटेलचे मालक राकेश शिंदे आणि कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीबाबत सांगत असताना पाटील म्हणाले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे वडील रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना चहा द्यायचे. मोदीजीही त्यांना या कामात मदत करायचे. अगदी याचप्रमाणे माझे वडीलही मुंबईच्या मिलमधील कामगारांना चहा देण्याचे काम करायचे. त्यामुळे चहा आणि चहा विक्रेत्यांसोबत माझे अतुट नाते आहे. माझ्या वडिलांच्या ओळखपत्रावर “किटली बॉय” अशी ओळख होती. लहानपणी दसऱ्याला आम्हा भावंडांना वडिलांच्या मिलमध्ये जाण्याची संधी मिळायची, तेव्हा आई वडिलांचे कष्ट जवळून दिसायचे, असे पाटील म्हणाले.
पाटील यांनी श्री दत्त हॉटेलचे मालक राकेश शिंदे आणि कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्यासोबत मनमोकळेपणे संवाद साधला. या वेळी लहानपणीच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला, या भेटीत चहाचा आस्वादही घेतला असल्याचे पाटील म्हणाले.
Get real time updates directly on you device, subscribe now.