कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचा चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थतीत शुभारंभ संपन्न

16
कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचे आज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ देखील उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासाखी दिव्यदृष्टी लाभलेल्या नेत्यापाठी आपली मतरूपी शक्ती उभी करण्याची आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याची प्रेरणा नूतन प्रचार कार्यालय प्रदान करेल, अशी आशा या वेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार धनंजय महाडिक , आमदार राजेश पाटील, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार के. पी. पाटील, समरजितसिंह घाटगे, माजी आमदार चंद्रदिप नरके, सत्यजित नाना कदम, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चव्हाण, उत्तम कांबळे, वीरेंद्र मंडलिक, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, राहुल देसाई, राजेखान जमादार, सुजित चव्हाण, आदिल फरास, रुपाराणी निकम, गायत्री राऊत, जाहिदा मुजावर, रेखा आवळे, मंगलताई साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.