रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने, एकजुटीचे काम करावे – चंद्रकांत पाटील
सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.