सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जमलेल्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद देखील साधला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवल्या. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मराठा समाजाला आरक्षण सर्वप्रथम देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले, जे उच्च न्यायालयातही टिकले. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, ते गेले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ते परत मिळवून दिले. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन केले.
या वेळी लोकसभेच्या माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. संजयमामा शिंदे, भाजपा सोलापूरचे अध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.