पुणे : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीने क्रांतिसूर्यांच्या जयंतीनिमित्त “भव्य एकता मिसळ” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन कार्यकर्त्यांसह मिसळीचा आस्वाद घेतला.
आमदार दीपक पायगुडे यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. आंतराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णुजी मनोहर यांनी तब्बल दहा हजार किलोंची मिसळ तयार केली. अजितदादांच्या मिश्किल शेरेबाजीने मिसळीची चव आणखीच वाढली…असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. यावेळी पुणेरी पगडी घालून मिसळ बनवण्याचा आनंद देखील पाटील यांनी घेतला.
पुण्यातील गंज पेठ येथील फुले वाड्यात १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी या मेजवानीचा आनंद लुटला.