लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर कार्यालयात बैठक संपन्न

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील नियोजन करण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि राज्यसभेतील खासदार डॉ. दिनेश जी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पुणे शहर कार्यालयात गुरुवारी बैठक घेण्यात आली . बैठक सुरू होण्यापूर्वी जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, बैठकीत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी “अब की बार ४०० पार”चा दृढसंकल्प महायुतीच्या सर्व घटकपक्ष सदस्यांनी केला. तसेच पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवरही चर्चा करण्यात आली.
राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार माधुरीताई मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे , प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश चिटणीस वर्षाताई डहाळे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले व सर्व लोकसभा समन्वयक समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!