अवघ्या पाच वर्षांत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकरजी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा पूर्णतः बदलवली – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कणखर नेतृत्वात भारताने जागतिक पातळीवर परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून निर्माण केलेले स्थान प्रत्येक भारतीयाला समाधान वाटावे असेच आहे. या धोरणात परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर जी यांचा वाटा मोठा आहे. अतिशय कमी कालावधीत आपल्या कामाची छाप सोडणारे डॉ. एस. जयशंकर जी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी पुणेकरांना मिळाली. त्यांचे विचार ऐकण्यासाठी पुणेकर तरुणाईचा जनसागर लोटला होता. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

 चंद्रकांत पाटील म्हणाले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कणखर नेतृत्वात भारताने साधलेल्या प्रगतीमुळे अवघे जग भारताचे कौतुक करत आहे. यामध्ये मा. मोदीजींच्या मंत्रिमंडळातील सहकारी एस. जयशंकरजी यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. अवघ्या पाच वर्षांत एस.जयशंकरजी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा पूर्णतः बदलवली आहे. कोणत्याही कुरापती खपवून न घेणारे आणि त्याचवेळी जगाच्या कल्याणाचा विचार करणारे जबाबदार राष्ट्र अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या तरुणांना मायदेशात परत आणण्यापासून अनेक गुंतागुंतीचे विषय मा. मोदीजींच्या खंबीर पाठबळामुळे त्यांनी अतिशय सहजपणे सोडवले आहेत. त्यामुळे त्यांचे विचार ऐकण्यासाठी पुणेकर तरुणाईचा जनसागर लोटला होता. त्यांची ही मुलाखत तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरली असेल यात तिळमात्र शंका नाही, ते पाटील यांनी म्हटले.

एस.जयशंकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हटले, भारत कसा पुढे जाईल याचा आम्ही विचार करतो, आमचा आत्मविश्वास देशाला विकसित भारताकडे नेणारा आहे. त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. गेल्या चार वर्षांत भारताची संस्कृती, वारसा याबद्दल देशातील नागरिकांमध्ये स्वयंजागृती झाली. इंडियापेक्षा अधिक भारताची विचारधारा आहे. हा भारत दबावात दबत नाही, निर्णय घेतो आणि अंमलात आणतो हा बदल या दशकात झाला.आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत पश्चिमी संस्कृतीतील उदाहरणे दिली जातात. आपण आल्या इतिहासातील, संस्कृतीतील उदाहरणे दिली पाहिजेत, ज्यामधून शिकायला मिळेल. गेल्या काही वर्षांत जग कनेक्टेड झाले. मोबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी वाढली. आपली मुले बाहेर शिकायला जातात. त्यांच्यावर तणाव किंवा संकट असू शकतात. कोविड काळात या मुलांना देशात परत आणले. असे काही महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.

खासदार प्रा. मेधाताई कुलकर्णी, आ. माधुरीताई मिसाळ, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, विक्रांत पाटील, धीरज घाटे, माधव भांडारी, विजय चौथाईवाले, युवा स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष पुनीत जोशी यांची उपस्थिती होती.  

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!