बाबासाहेबांनी आपल्या देशाला राज्यघटना देऊन आपल्या सर्वांवर अनंत उपकार केले आहेत, त्यामुळे त्यांचे ऋण फेडणे आजन्म शक्य नाही – चंद्रकांत पाटील

17

पुणे : आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आज सर्वत्र मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत आहे. विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने ‘जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्व अनुयायांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांनी आपल्या देशाला राज्यघटना देऊन आपल्या सर्वांवर अनंत उपकार केले आहेत. त्यामुळे त्यांचे ऋण फेडणे आजन्म शक्य नाही, अशी भावना याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी रिपाइं आठवले गटाचे नेते परशुरामजी वाडेकर, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या सह हजारो अनुयायी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.