लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर… मोदीजींच्या संकल्पाला कोकणातूनही ताकद! – चंद्रकांत पाटील
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. पक्षाचा आपल्यावरील विश्वास आपण कायम राखाल, असा विश्वास असल्याचे पाटील यांनी याबाबत म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ‘अबकी बार ४०० पार’ चा नारा दिला आहे, त्यातलीच एक जागा रत्नागिरी-सिंधुदुर्ग ठरण्यासाठी कोकणवासी नारायण राणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील, याची खात्री असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देखील दिल्या.