पुणे : लोकसभेच्या बारामती मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प सर्वांनी केला.
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील , ज्येष्ठ भाजपा नेते हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे असतात त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही. सौ.सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे मत यासमयी त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले असून ते सत्यात उतरवण्यासाठी सौ.सुनेत्रा पवार यांना निवडून द्यावे लागेल असे निक्षून सांगितले.
Get real time updates directly on you device, subscribe now.