सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ८ मधील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी चंद्रकांत पाटील यांनी साधला संवाद

25

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या सांगली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ८ मधील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, सांगली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क साधावा. बूथवर काम केल्यास मताधिक्य वाढेल, अशा सूचना पाटील यांनी केल्या. यावर सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून मताधिक्य वाढवू, असा निर्धार देखील व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.