खतांच्या सब्सिडीबद्दल केलेल्या वक्तव्यांतून उद्धवजी ठाकरे यांना या विषयाची अपुरी माहिती असल्याचे स्पष्टच होते – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

20

मुंबई : विदर्भातील एका सभेत उद्धव ठाकरे यांनी खतांच्या सब्सिडीबद्दल भाषण केले आणि  मोदी सरकारवर टीका केली. यावरून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना चोख प्रत्युउत्तर दिले .  ते म्हणाले कि,अपुरी माहिती असलेल्या विषयावर बोलून कधी कधी बोलणाऱ्याची पंचाईत होते. खतांच्या सब्सिडीबद्दल केलेल्या वक्तव्यांतून उद्धवजी ठाकरे यांना या विषयाची अपुरी माहिती असल्याचे स्पष्टच होतेय. पण त्यामुळे मोदी सरकार आपल्यासाठी काय काय करतंय, हे शेतकऱ्यांना व्यवस्थित समजले. त्याबद्दल तुमचे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि या निवडणुकांमध्ये ज्याला ज्याला जे वाटेल ते ते तो बोलत राहिला आहे. मग आकडेवारी माहिती करून घ्यायची नाही, परिणाम माहिती करून घ्यायचे नाहीत. उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील एका सभेमध्ये अत्यंत हास्यास्पद विधान केले. ते म्हणाले शेतकऱ्यांनो एक लाखाचं खत जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्ही १८ टक्के जीएसटी म्हणजे १८ हजार तुम्ही सरकारला देता त्यातले सहा हजार रुपये ते तुम्हाला शेतकरी सन्मान निधी म्हणून देतात.
या विधानावर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला कि, तुम्ही कधी शेती केलीय का?, शेतकऱ्याला खत किती लागत ते तुम्हाला माहिती आहे कि? खतावर केवळ ५ टक्के जीएसटी लागतो. शेतकरी सन्मान योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याला जे पैसे मिळतात ते अत्यंत कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्याला मिळतात. त्यामुळे काहीही बोलायचं , लोकांना भ्रमित करायचं त्यातून काहीही साध्य होणार नाही, असे पाटील यांनी म्हटले. पण उद्धव ठाकरे यांच्या या अपुऱ्या ज्ञानामुळे मोदी सरकार आपल्यासाठी काय काय करतंय, हे शेतकऱ्यांना व्यवस्थित समजले. त्याबद्दल तुमचे आभार उद्धवजी!, असे मिश्कीलपणे पाटील यांनी म्हटले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.