लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवरांसोबत साधला संवाद
सोलापूर : औद्योगिक क्षेत्रात सोलापूर शहराचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. सोलापूर ही वस्त्रोद्योग नगरी म्हणूनही परिचित आहे. इथल्या चादरी आणि टॉवेल हे जगप्रसिद्ध आहेत. या अनुषंगाने आज पेंटप्पा गड्डम यांच्या जे. जे. प्रा. लिमिटेडच्या कारखान्यात बैठक आयोजित करून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद साधला.