सतत कार्यमग्न असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी आजवर केलेल्या जनसेवेच्या बळावर ते ऐतिहासिक मताधिक्क्याने नक्कीच विजयी होतील – चंद्रकांत पाटील

5

पुणे, २५ एप्रिल : आज जनता जनार्दनाच्या साक्षीने आणि आशीर्वादाने लोकसभेच्या पुणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला. याप्रसंगी झालेली पुणेकरांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती त्यांच्या विजयाची जणू नांदी करणारी होती. मोहोळ यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, खंबीर नेतृत्व, अथक परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन, कुशल संघटन, सर्वसमावेशक वृत्ती अशा असंख्य सद्गगुणांमुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या विकासाला गती दिली आहे. ती कायम राहण्यासाठी मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणे ही काळाची गरज आहे. आदरणीय मोदीजींच्या मार्गदर्शनानुसारच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ कार्यरत आहेत. सतत कार्यमग्न असलेल्या मोहोळ यांनी आजवर केलेल्या जनसेवेच्या बळावर ते ऐतिहासिक मताधिक्क्याने नक्कीच विजयी होतील, असा ठाम विश्वास वाटतो, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून डेक्कनमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले यांच्यासह पुण्यातील महायुतीचे आमदार, शहर पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता झाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.