पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरुड मतदारसंघातील स्वप्नशिल्प सोसायटीमधील रहिवाशांसोबत संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, मोदीजींच्या कार्याचा डंका देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील वाखाणण्याजोगा आहे. गेल्या ५० वर्षांतली अपेक्षित विकासकामे माननीय मोदीजींनी गत १० वर्षांत करून दाखवली आहेत. त्यामुळे, मोदीजींचे विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले. तसेच, मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.