पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीवर विश्वास दर्शविणाऱ्या पुणेकरांना पाहून महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा दृढ विश्वास – चंद्रकांत पाटील
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पुण्यातील रेसकोर्स मैदानावर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या भव्य जाहीर सभेस संबोधित केले. आगामी लोकसभा निवडणुकीचे महत्व, देशाच्या विकासाची भूमिका अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मोदीजींनी सभेला संबोधित केले. अलोट गर्दीच्या साक्षीने या संकल्प सभेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मतदारांचे महायुतीवर असलेल्या प्रेमाची प्रचिती आली.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अमितजी ठाकरे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते, सहकारी पदाधिकारी आणि जनसमुदाय उपस्थित होता.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांची महाविजय संकल्प सभा रेस कोर्स येथे मोठ्या उत्साहात पार पडली. मोदीजींच्या खंबीर नेतृत्वात भारत सर्वांगीण विकास साधतो आहे. या सभेस उपस्थित राहून मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीवर विश्वास दर्शविणाऱ्या पुणेकरांना पाहून महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा दृढ विश्वास वाटत असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.