सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागतिक कामगार दिनानिमित्त सोलापूर येथील विष्णू चाळीतील दिलीप कोल्हे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या कुटिर उद्योगास भेट देऊन माहिती घेतली.
दिलीप कोल्हे यांनी सुरु केलेल्या या कुटिर उद्योगाचा आवाका वाढल्याचे पाहून अतिशय आनंद झाला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. या वेळी मोहन डांगरे, वसंत जाधव, योगेश डांगरे, लक्ष्मीकांत ढोंगे पाटील, अविनाश मागावकर आदीही उपस्थित होते.