चंद्रकांत पाटील यांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्याची पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना केली विनंती

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान प्रक्रिया सुरू असून पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात ७ जानेवारी तर पुणे, शिरुर, मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पुण्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांना निवेदनाद्वारे केली.