पुणे : पुणे खवय्यांचे शहर आहे. खाद्यान्न निर्मिती आणि प्रक्रियाकृत खाद्य उद्योग क्षेत्राला वेगळीच परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील खाद्यपदार्थ निर्मिती क्षेत्रातील मिठाई आणि फरसाण असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना पुण्यातील खाद्यपदार्थ निर्मिती क्षेत्रातील मिठाई आणि फरसाण असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी सध्या पनीरऐवजी एनालॉगचा वापर सर्वाधिक होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. हा प्रकार रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू, असे या पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.