चंद्रकांत पाटील यांनी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत सुतारवाडीचे ग्रामदैवत भैरवनाथांचे घेतले मनोभावे दर्शन

6

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सध्या व्यस्त आहेत. आज त्यांनी कोथरूड मतदारसंघातील सुतारवाडी येथे आयोजित बाईक रॅलीला हजेरी लावली आणि त्यानंतर  खराडी येथे दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नादगम यांची देखील भेट घेतली.

लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील सुतारवाडी येथे बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. हि रॅली सुरु होण्यापूर्वी पाटील यांनी सुतारवाडीचे ग्रामदैवत भैरवनाथांचे मनोभावे दर्शन आणि आशीर्वादही घेतले. यावेळी उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.

पुणे दौऱ्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी खराडी येथे दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नादगम यांची देखील भेट घेतली. नादगमजींसमवेत दलित पॅंथरच्या सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी पाटील यांचे अगत्याने स्वागत केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.