चंद्रकांत पाटील यांनी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कसबा येथील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कसबा येथील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन, उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी, त्यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पाटील यांनी विविध जिल्ह्यांचे दौरे केले. पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पाटील यांनी विविध कार्यकर्ते आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन मोहोळ यांना विजयी करण्याचे आवाहन केले.