पुणे : भाजपाचे नागपूर जिल्ह्या माजी अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड.बळवंतराव ढोबळे यांचे आज निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बळवंतराव ढोबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले कि, त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लावण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ढोबळे यांनी केले. तसेच जवाहर विद्यार्थी गृह, रामटेक तेली समाज धर्मशाळा, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अशा अनेक ससंस्था पुढे नेण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना, असे पाटील यांनी म्हटले.
नागपूर महापालिकेत ढोबळे २५ वर्ष नगरसेवक होते. १९९० मध्ये ते विधानपरिषदेवर होते. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.