पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आहेत. लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मंगळवारी शिवाजीनगर भागात पदयात्रेद्वारे मतदार बांधवांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना अधिकाधिक मतांनी विजयी करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी केले.चंद्रकांत पाटील हे सध्या मोहोळ यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. मोहोळ यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.