राज ठाकरे यांच्या १० तारखेला होणाऱ्या पुण्यातील बैठकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

26

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ते सध्या व्यस्त आहेत. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची सभा १० मे रोजी पुण्यात होणार आहे या पार्श्वभूमीवर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पाटील यांनी माहिती दिली कि , महायुतीच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची सभा १० मे रोजी पुण्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सभेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.